कर्नाटक निवडणुकीचे पडसाद

कर्नाटक निवडणुकीचे रणशिंग आणि पडसाद

सध्या भारतात ‘निवडणुका’ हा सर्वांसाठी आवडीचा विषय बनला आहे. १८ वर्ष पूर्ण केलेली तरुणाई असो किंवा निवृत्त झालेला नोकरदार वर्ग, घरात काम करणारी गृहिणी असो किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रिया, शेअर बाजारातील ब्रोकर असो किंवा सट्टेबाजारातील सट्टेबाज ह्या सर्वांना निवडणुकांमध्ये रस असतो. प्रत्येकाची करणे वेगवेगळी असली तरी इंटरेस्ट हा असतोच. सध्याची कर्नाटक निवडणुका कदाचित हेच अधोरेखित करतेय. कर्नाटका सारख्या राज्यामध्ये होणार्या निवडणुकांचे पडसाद हे महाराष्ट्र, मुंबई शेअर बाजारात , महाराष्ट्र- कर्नाटका सीमाभागात उमटणार हे साहजिकच आहे. केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटका भाजपची सत्ता आल्यावर आतातरी बेळगाव आणि अन्य सीमाभागातील रहिवाश्यांना न्याय मिळेल…